आज आम्ही एका मराठमोळ्या गिर्यारोहकाबद्दल सांगणार आहोत. त्याने जगातील सात खंडापैकी दोन खंडातील दोन सर्वोच्च शिखरे सर करून विश्वविक्रम केला आहे. त्याच्या कामगिऱ्यांची यादी इथेच थांबत नाही. चला तर त्याची संपूर्ण ओळख करून घेऊया.
या गिर्यारोहकाचं नाव आहे वैभव पांडुरंग ऐवळे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या संगोली येथील वाढेगावातला. वैभवने १५, ऑगस्ट २०१८ रोजी भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो सर करून ७२ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम केला. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि हाई-रेंज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती.






