चक्क एका पुरुषाला ‘जगातील सर्वोत्कृष्ट आई’चा पुरस्कार मिळणार आहे.

लिस्टिकल
चक्क एका पुरुषाला ‘जगातील सर्वोत्कृष्ट आई’चा पुरस्कार मिळणार आहे.

मुल दत्तक घेताना कोणताही पालक एका सुदृढ बाळाची निवड करेल, पण पुण्याच्या आदित्य तिवारीने चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार आहे. हा आजार झालेल्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं. आदित्यने एकट्याने आपल्या बाळाची काळजी घेतली आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्याला महिला दिनी ‘जगातील सर्वोत्कृष्ट आई’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आदित्यने २०१६ साली २२ महिन्याच्या अविनिशला दत्तक घेतलं. अविनिशला डाऊन सिंड्रोम आहे. आदित्यने आपली सॉफ्टवेअर इंजिनियरची नोकरी सोडली आणि ‘स्पेशल’ मुलांच्या आईवडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. आदित्यच्या लक्षात आलं की भारतात बौद्धिक अपंगत्वसाठी (intellectually-disabled) वेगळा विभाग नाही. सरकारही अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देत नाही. म्हणून आदित्यने ऑनलाईन याचिका दाखल केली. परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे आणि मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात येत आहे. 

आजपर्यंत आदित्य आणि अविनिश यांनी मिळून २२ राज्यांची सफर केली आहे. जवळजवळ ४०० ठिकाणी सभा आणि कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातील १०,००० पालकांशी जोडलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे संयुक्त राष्ट्राने आदित्यला याविषयावर झालेल्या परिषदेत भाग घेण्याचं निमंत्रण दिलं होतं.

८ तारखेला बंगळुरू येथील कार्यक्रमात आदित्यला पुरस्कार मिळणार आहे. कार्यक्रमातील चर्चासत्रातही तो भाग घेणार आहे.

आदित्यने केलेलं काम महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्याला ‘जगातील सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार मिळतोय हे समर्पक आहे असं म्हणावं लागेल.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख