स्वदेशी चळवळीच्या तीन कथा भाग ३ : बॉम्बे स्वदेशी स्टोअर !!

स्वदेशी चळवळीच्या तीन कथा भाग ३ : बॉम्बे स्वदेशी स्टोअर !!

स्वदेशी चळवळीतील पुढील भाग आहे बॉम्बे स्टोअरवर. हे दुकान आज उभे आहे स्वदेशी चळवळीच्या जोरावर. चला तर मग बघूया काय आहे या मागील गोष्ट!!

 

बॉम्बे स्वदेशी स्टोअर

‌स्वदेशीची लाट मुंबईत कशी उसळली होती, याचे दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईच्या फोर्टमधलं बॉम्बे स्टोअर! सध्या मुंबईत जी नामांकित आणि अग्रगण्य हायफाय लाईफस्टाइल स्टोअर आहेत, त्यांपैकी हे एक दुकान आहे.

‌फारच थोड्या लोकांना हे माहिती आहे की हे दुकान म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी चळवळीचे प्रतिक आहे. या दुकानाचे मूळ नाव होते बॉम्बे ‌स्वदेशी स्टोर! ‌टिळक या दुकानाचे संस्थापक होते. केवळ स्वदेशी मालाच्या विक्रीसाठी स्थापन केलेल्या या दुकानाचे उद्घाटन दादाभाई नौरोजीच्या हस्ते करण्यात आले होते.

टिळक या दुकानाचे संस्थापक होते. केवळ स्वदेशी मालाच्या विक्रीसाठी स्थापन केलेल्या या दुकानाचं उद्घाटन दादाभाई नौरोजीच्या हस्ते करण्यात आलं होतं.  टिळक गेले आणि हळूहळू या दुकानाचे महत्त्व कमी झालं. स्वातन्त्र्य मिळाल्यावर हे दुकान कसंबसं तग धरून चालत होतं.

स्रोत‌

टिळक गेले आणि हळूहळू या दुकानाचे महत्त्व कमी झालं. स्वातंत्र्य मिळाल्यावर हे दुकान कसेबसे तग धरून चालत होते. ‌याच दरम्यान कधीतरी दुकान चंपकलाल इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीला[CIFCO]  विकलं गेलं. त्यानंतर या दुकानाची रयाच गेली. तरीपण या दुकानाच्या शेअरची किंमत बाजारात चांगली होती. CIFCO च्या मालकांच्या निधनानंतर असीम आणि मिलन दलाल या नव्या पिढीनं हे दुकान डी-मार्ट च्या दमाणी यांना विकलं. आणि... दमाणींनी या स्टोअरचा कायापालट केला.

स्रोत‌

आता हे स्टोअर चकाचक आणि सुंदर वस्तूंनी खचाखच भरलेले आहे. विदेशी पर्यटकांच्या “Must See in Mumbai” च्या यादीत एक नंबरचे स्टोअर आहे. त्याच्या अनेक शाखा आहेत. स्टोअर अत्यंत सुंदर झाले आहे पण टिळकांना सगळेचजण विसरले आहेत. २३ जुलैला ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ यांची जयंती आहे..  पण दुकानातल्या त्यांच्या तसबीरीच्या नशिबी त्यादिव‌शी फुलांचा एक हार ही नसेल !

कधी या भागात आलात तर या दुकानाला जरूर भेट दया. खरेदी साठी नव्हे तर टिळकांचे स्मरण करण्यासाठी भेट दया. टिळकांना थोडे बरे वाटेल.

 

शेवटी काय? तर स्वदेशी चळवळीला दिलेलं अधिकृत नाव म्हणजे 'मेक इन इंडिया' !!

टॅग्स:

marathibobhata marathimarathi newsbobhata news

संबंधित लेख