कोरोनाव्हायरसच्या हेल्पलाईनवर सामोसा मागत होता...अधिकाऱ्यांनी काय केलं पाहा !!

लिस्टिकल
कोरोनाव्हायरसच्या हेल्पलाईनवर सामोसा मागत होता...अधिकाऱ्यांनी काय केलं पाहा !!

कोरोना विषाणूचं संक्रमण आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आणि मदतसाठी सरकारतर्फे हेल्पलाईन्स नंबर जारी करण्यात आले आहेत. आपल्यातले काही महाभाग असे आहेत जे या नंबरवरही फोन करून टाइमपास करत असतात. एखाद्या महिलेचा नंबर असेल तर त्यांना J1 झालं का विचारण्याची कर्तबगारीही गाजवण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमध्येही काहीसं असंच घडताना दिसतंय. नुकतंच उत्तर प्रदेशमधल्या हेल्पलाईनवर एक फोन आला. फोनवर जो माणूस बोलत होता त्याने चक्क सामोसे आणि चटणी ऑर्डर केली. त्याने इथेच न थांबता तिथल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. यानंतर जे घडलं तो अशा लोकांसाठी चांगलाच धडा ठरला आहे.

लवकरच अधिकाऱ्यांची एक टीम या माणसाच्या घरी पोहोचली. सामोसे तर मिळाले नाहीच पण त्याला नालेसफाईचं काम मिळालं. हा फोटो पाहा.

अशा प्रकारचं हे पहिलंच प्रकरण नाही. लोकांनी हेल्पलाईनवर फोन करून पिझ्झाही मागवला आहे. काही लोकांनी तर हेल्पलाईन नंबरवर टिकटॉक व्हिडीओ पाठवलेत. अशा टाईमपास बहाद्दर लोकांना आता सगळ्यांसमोर नालेसफाईच्या कामाला जुंपण्यात येत आहे. 

तसं पाहता काही गरजू लोकांना मोफत अन्नही वाटलं जात आहे, पण ज्यांची ऐपत आहे अशा लोकांकडूनही मोफतच्या अन्नाची मागणी होत आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी त्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात येत आहेत. फोटोमधला त्यांचा चेहरा झाकण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलंय की जर असे प्रँक कॉल येतच राहिले तर आम्ही त्यांचे चेहरेही जगाला दाखवू.

तर मंडळी, अशा बहाद्दर लोकांना तुम्ही काय शिक्षा दिली असती? कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

टॅग्स:

bobhata marathiBobhatabobatamarathimarathi bobhata

संबंधित लेख