ट्रॅफिक नियम मोडूनही त्याला पोलिसांनी सोडून का दिलं ? कारण फारच भन्नाट आहे राव !!

लिस्टिकल
ट्रॅफिक नियम मोडूनही त्याला पोलिसांनी सोडून का दिलं ? कारण फारच भन्नाट आहे राव !!

नविन ट्रॅफिक नियम आल्यापासून रोजच्या रोज मजेशीर गोष्टी घडत आहेत. अनेकांना या नियमांचा चांगलाच फटका बसला, तर काहींना गेल्या 15 दिवसात घडत असलेल्या मजेशीर गोष्टींमुळे चांगले मनोरंजन मिळत आहे. आता पण अशीच एक भन्नाट घटना घडली आहे.

सोमवारी गुजरात पोलिसांनी एकाला विना हेल्मेट गाडी चालवताना पकडले होते, पण त्याचे हेल्मेट न घालण्याचे कारण ऐकून ते पण पेचात पडले !! त्याचे कारण एवढे अफलातून होते की त्याला सोडून द्यावे की दंड लावावा हेच पोलिसांना कळत नव्हते. 

पोलिसांनी त्याला दंड भरायला सांगितले तेव्हा त्याने त्याची समस्या सांगितली. मंडळी, या भाऊच्या डोक्याला पुरेल असे हेल्मेट कुठल्याच दुकानावर मिळत नाही. त्यावर हा गडी तरी काय करणार. त्याच्या सोबत सगळे कागदपत्रे होती त्यावरून तो कायद्याचा सन्मान करणारा नागरिक दिसत होता.

पोलिसांना जेव्हा त्याने त्याची ही समस्या सांगितली तेव्हा पोलीस पण पेचात पडले. तो खरं बोलत आहे का याची शहनिशा करण्यासाठी तिथल्या तिथे त्याला हेल्मेट पण देण्यात आला. तो खरं बोलत आहे हे सिद्ध झाल्यावर त्याची समस्या समजून घेऊन पोलिसांनी त्याला दंड न आकारता सोडून दिले!!!

 

लेखक : वैभव पाटील

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख