सोशल मीडियावर लोकांना काहीना काही झणझणीत हवंच असतं. सध्या जगभरातील मिम्सकर्मी जमातीला टेस्ला आणि स्पेसेक्सचे मालक इलॉन मस्क याने असंच झणझणीत कारण शोधून दिलंय. त्याचं काय झालं, इलॉन मस्क आणि गायिका ग्राईम्स यांनी आपल्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. नुकतंच इलॉनला कोणीतरी विचारलं की मुलाचं नाव काय. तेव्हा तो काय म्हणाला पाहा.
X Æ A-12 Musk
— Elon Musk (@elonmusk) May 5, 2020
त्याने मुलाचं नाव 'X Æ A-12’ सांगितलं. याचा अर्थ काय होतो हे इलॉन मस्कलाच माहित, पण त्यामुळे मिम्सकर्मी जमातीला नवीन विषय मिळाला. काही मोजके मिम्स आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी आणले आहेत.
पण थांबा हे सगळं ज्याच्यासाठी चाललंय त्या मुलाचं तोंड बघून घ्या.





