मंडळी, आपण जाणतो की ह्या लॉकडाऊन पश्चात जग प्रचंड बदलणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सने अनेक बदल आणले आहेत आणि त्यांचा वेग ह्या करोनाने आणखी वाढवला आहे. ह्या परिस्थितीत लेखन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की, ना कोणती साथ त्याला अडवू शकते ना आर्टिफिशल इंटेलिजन्स!
मंडळी, ओरिजनल कंटेटला जागतिक बाजारपेठेत आज कल्पनाही करता येणार नाही एवढी किंमत आहे. जेफ बजोज हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस… अमेझॉन ही त्याची कंपनी! त्यांनाही मनोरंजन क्षेत्रात यायची गरज का वाटत असावी? अगदी लॉकडाऊनच्या काळात जिथे सर्व काही ठप्प आहे तिथे मात्र ऑनलाइन स्ट्रीमिंग कंपन्या जश्या नेटफ्लिक्स, अमेझॉन इ. आपले नवं-नवे व्यावसायिक विक्रम प्रस्थापित करत आहेत. एकवेळ अशीही येईल जिथे ऍनिमेशनने पूर्ण चित्रपट बनेल... ना शुटिंगची गरज लागेल ना कलाकारांची! मात्र एक जण ह्या मनोरंजन उद्योगाचा पाया आहे त्याला तुम्ही कधीही हलवू शकणार नाही तो म्हणजे लेखक!



















