हँडसम हंक मिलिंद सोमण हा आजही म्हणजे वयाच्या ५५व्या वर्षी लाखो तरुणींच्या दिलाची धडकन आहे. मुलींना तर तो आवडतोच पण तरुणही त्याचे फिटनेस पाहून त्याला फॉलो करतात. दर काही दिवसांनी तो कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतोच. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे व्यायामाचे फोटो आपण पाहिलेच असतील, पण सगळ्यांना उत्सुकता होती की एवढं फिट राहण्यासाठी तो खातो तरी काय? आज मिलिंद सोमणने स्वतः च त्याच्या फिटनेसमागील रहस्य काय आहे हे पोस्ट केले आहे. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत त्याने डायट प्लॅनच त्याने शेयर केला आहे.
मिलिंद सोमणचा डाएट प्लॅन एकदा बघून घ्याच.
तो रोज सकाळी उठल्याबरोबर 500 ml पाणी पितो. हे पाणी साध्या तपमानातले असते. सकाळी १०च्या सुमारास नाश्त्यात तो थोडेसे शेंगदाणे, एक पपई, एक टरबूज आणि हंगामातले फळ जसे सध्या आंबे आहेत. आंबे असतील तर ४ खातो.
दुपारचे जेवण तो २ वाजता घेतो. ज्यामध्ये साधारणत: डाळ भात किंवा तांदूळाची खिचडी, स्थानिक आणि हंगामी भाज्या, घरी बनवलेले दोन चमचे साजूक तूप यांचा समावेश असतो. त्याशिवाय ज्या दिवशी तो भात खात नाही त्या दिवशी ६ चपात्या, भाजी किंवा डाळ खातो. मांसाहार अन्न तो फारसे खात नाही. महिन्यातून एकदा अंडी, चिकन किंवा मटण खातो.
मिलिंद संध्याकाळचा नाश्ता ५ वाजता करतो. संध्याकाळचा नाश्तात तो गूळ घातलेला ब्लॅक टी पितो. रात्रीचे जेवण तो ७ वाजता घेतो. रात्रीच्या जेवणात हलका आहार घेतो जसे खिचडी आणि भरपूर भाज्या. रात्रीच्या वेळी तो मांसाहार करत नाही. रात्री झोपण्याआधी तो कोमट पाण्यात हळद घालून पितो. गोड खायचे असेल तर तो गूळ घातलेले गोड पदार्थ खातो.
मिलिंद सोमणने काय खाणे टाळावे हेही आवर्जून सांगितले आहे. तो स्वतः ते कसोशीने पाळतो. प्रक्रिया केलेले किंवा पॅकेज केलेले अन्न, पूरक किंवा कृत्रिम जीवनसत्त्वे, कोल्ड वॉटर, सॉफ्ट ड्रिंक्स. पाणी ही जास्त थंड किंवा कोमट पित नाही. त्याचे मद्याचे प्रमाणही ठरलेले आहे. वर्षातून एक किंवा दोनदा फक्त एक ग्लास मद्य घेतो.





