आयुष्यात अडीअडचणी आल्या तर चार पैशांची बचत हाताशी असावी असं सगळ्यांनाच वाटतं. पण ही बचत कशी करायची? केलेली बचत कशी सुरक्षित ठेवायची ? बचतीच्या रुपाने जमा केलेली पुंजी वाढवायची कशी ?
हे प्रश्न सगळ्यांनच छळत असतात. यांपैकी बचत कशी करायची हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे. सुरक्षिततेचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. एके काळी पैसे बँकेत जमा केले की ते सुरक्षित असा जो समज होता, तो नुकताच बर्याच बँकांनी खोटा ठरव्ला आहे. खाजगीत पैसे गुंतवावे तर बुडण्याचीच शक्यता जास्त . सोन्याचांदीत बचत करावी तर त्यावर पुसेसा परतावा मिळत नाही. सरकारी बँका दर दोन चार महिन्याला व्याज कमी जास्त करतच असतात.










