एसबीआय बँकेने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ३ नवीन नियम लागू केले आहेत. तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला या गोष्टी माहित असायलाच हव्यात. काय आहेत ते ३ नियम? चला तर पाहूया.
(सर्व नियम १ जानेवारी २०२० पासून लागू करण्यात आले आहेत.)

एसबीआय बँकेने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ३ नवीन नियम लागू केले आहेत. तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला या गोष्टी माहित असायलाच हव्यात. काय आहेत ते ३ नियम? चला तर पाहूया.
(सर्व नियम १ जानेवारी २०२० पासून लागू करण्यात आले आहेत.)

रात्री ८ पासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत जर तुम्हाला ATM मधून १०,००० पेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर आता OTP वेरिफिकेशन गरजेचं ठरणार आहे. रक्कम लिहिल्यानंतर तुमच्यासमोर OTP चा पर्याय दिला जाईल. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्यात येईल. हा OTP लिहिला की तुमचा व्यवहार पूर्ण होणार आहे. हा नियम फक्त SBIच्या ATM साठी असणार आहे. या नव्या पद्धतीमुळे ATM व्यवहारात सुरक्षितता वाढेल असं SBI चं म्हणणं आहे.

१ जानेवारीपासून SBI चे जुन्या मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले ATM कार्ड्स अवैध ठरणार आहेत. हा नियम रिझर्व बँकेकडून सर्व बँक ग्राहकांना लागू करण्यात आला होता. मॅग्नेटिक स्ट्रीप असलेल्या कार्ड्सवर २०१९ पासूनच बंदी आणण्यात आली होती. SBIने यावर्षी पूर्णपणे बंदी आणलेली आहे. तशी आगाऊ सूचना ग्राहकांना देण्यात आली होती. जुन्या चुंबकीय पट्ट्या असलेल्या ATM कार्डपेक्षा EMV चीप जास्त सुरक्षित असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला होता. EMV चीपबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख वाचा :
१ जानेवारीपासून हे ATM कार्ड्स होणार बंद...जाणून घ्या नवे कार्ड कसे मागवायचे ते !!

एसबीआयने आपल्या बेंचमार्क रेटमध्ये २५ पॉइंट एवढी कपात केली आहे. वर्षाकाठी ८.०५ टक्के या प्रमाणे असलेला व्याजदर आता ७.८० टक्के झाला आहे. याचा फायदा गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना तसेच लहान उद्योगधंद्यांना होणार आहे. नवीन गृहकर्जधारकांना ७.८० टक्क्यांप्रमाणे व्याज भरावा लागेल.
तर, काय म्हणाल या नियमांबद्दल ?

११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकल२८ मे, २०२२
लिस्टिकल२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकल३० ऑगस्ट, २०२१