छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातील सर्वात मोठं मोझॅक पोट्रेट !!

लिस्टिकल
छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातील सर्वात मोठं मोझॅक पोट्रेट !!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने एका मराठी कलाकाराने ४६.०८० प्लास्टिकच्या तुकड्यातून १०X८ फुट उंचीचं शिवाजी महाराजांचं चित्र साकारलं आहे. छत्रपतींच हे जगातलं सर्वात मोठं मोझॅक पोट्रेट आहे. आश्चर्य म्हणजे या कलाकाराने हे काम अवघ्या १० दिवसात पूर्ण केलंय.

या कलाकारांचं नाव आहे नितीन दिनेश कांबळे. तो एका खाजगी कंपनीत अॅनिमेटर म्हणून काम करतो. तो दिवसा नोकरी करायचा आणि रात्री चित्र तयार करायचा. या प्रकारे त्याने सलग १० दिवस अत्यंत मेहनतीने हे काम पूर्ण केलंय.  त्याने भुबनेश्वर येथून चित्राच्या कामासाठी लागणारं साहित्य मिळवलं. चित्र साकारण्यासाठी त्याने ६ वेगवेगळे रंग वापरले आहेत. 

नितीन म्हणतो की ‘आपल्या देशात प्लास्टिक वर बंदी आहे, पण जे प्लास्टिक आधीपासूनच बाहेर आहे त्याच्यावर आपल्याकडे उपाय नाही.’ त्याचा हा पहिलाच जागतिक विक्रम आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं भव्य चित्र यापूर्वीही साकारण्यात आलं होतं. गेल्या वर्षीचं ताजं उदाहरण घ्या. मंगेश निपाणीकर यांनी लातूरच्या निलंग्यात गवतापासून भव्य चित्र साकारलं होतं. ते चित्र एवढं भव्य होतं की गुगल मॅपवर सहज पाहता येत होतं. आमचा हा लेख पाहा.

भाऊ आपल्या लातूरच्या निलंग्यात झूम केल्यावर काय दिसतं पाहा !!

तर मंडळी, काय म्हणाल या लय भारी चित्राबद्दल? तुम्हाला आवडलं का ?

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख