तुम्हाला तर माहित आहेच की मरण कधी येईल ते सांगता येत नाही. आज आपण ठणठणीत आहोत तर उद्या कदाचित या जगात नसू. त्यामुळे फार पूर्वीच आपल्या ग्रंथांनी आणि साधू संतांनी संदेश दिलाय की आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा. बोभाटा आज हे तत्त्वज्ञान का झाडत आहे असा प्रश्न पडला ना ? त्याला कारण आहे नेदरलँडच्या एका विद्यापीठाने केलेला अचाट प्रयोग.
नेदरलंडच्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी थडगी का खणली आहेत ?


आयुष्याची किंमत कळावी म्हणून नेदरलँडच्या रॅडबाऊंड विद्यापीठाने मुलांसाठी 'Meditation Grave' म्हणजे 'योगसाधनेची थडगी' तयार केली आहेत. पण फक्त हे एकच कारण नाही, तर मुलांच्या मनातून परीक्षेची भीती घालवावी म्हणून देखील ही कल्पना शोधण्यात आली आहे..
जॉन हॅकिंग या विद्यापीठातील स्टाफ मेंबरने ही आयडिया शोधून काढली आहे. या कल्पनेला त्याने ‘Memento Mori’ असं नाव दिलंय. मराठीत याचा अर्थ ‘लक्षात ठेवा, तुम्हाला एके दिवशी मृत्यू येणार आहे’ असा काहीसा होतो. वरतीच म्हटल्याप्रमाणे आयुष्याची किंमत ओळखून एकही क्षण वाया न घालवता जगण्याचा मंत्र देण्यासाठी ही कल्पना शोधण्यात आली आहे.

या थडग्यात अंथरलेल्या चादरीवर लिहिलंय 'stay weird'. म्हणजे ‘विचित्र राहा’. ३० मिनिट ते ३ तासांपर्यंत विद्यार्थ्यांना आत राहण्याची परवानगी आहे, विद्यार्थी योग करू शकतात तसेच शांतपणे झोपू शकतात. मुख्य म्हणजे सोबत मोबाईल, लॅपटॉप किंवा पुस्तकं नेण्यावर बंदी आहे.
सहसा मृत्यूबद्दल बोलणं अभद्र समजलं जातं. पण इथे तर थडगीच बांधण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला या थडग्यात गेलंच पाहिजे असा नियम नाही. पण विद्यार्थ्यांनीच स्वतःहून या कल्पनेला उचलून धरलं आहे. एवढं की विद्यार्थ्यांना आधीच नाव नोंदणी करावी लागत आहे.

तर मंडळी, ही कल्पना तुम्हाला कशी वाटली?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१