पाणी भरपूर प्यावं हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पण आपण ऐकतो का ? तर फारच कमी लोक असतात जे हा सल्ला पाळतात. पाणी कमी प्यायल्याने निर्जलीकरण, थकवा येणे, चिडचिड, किंवा मुत्रमार्गात संसर्ग होण्याइतपत समस्या निर्माण होऊ शकतात. भारतात कमी पाणी प्यायचं एक गंभीर कारण दिसून आलं आहे, ते म्हणजे चांगल्या शौचालयाचा अभाव. खास करून मुली कमी पाणी पितात, जेणेकरून त्यांना शौचालयास जावं लागू नये. खरं तर लहान मुलांनी दिवसातून १.५ ते ३ लिटर पाणी प्यायला हवं.
या सगळ्या समस्या लक्षात घेता मंगळूर जवळच्या उप्पीनगडी गावातील इंद्रप्रस्थ विद्यालय या शाळेने एक अभिनव कल्पना राबवली आहे. या शाळेत दिवसातून ३ वेळा बेल वाजते. ही बेल मुलांना पाणी प्यायची आठवण करून देते.






