कुठल्याही देशाच्या प्रगतीत शिक्षणाचा वाटा मोठा मानला जातो. भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. पण देशात अनेक ठिकाणी चांगल्या शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा अजूनही मिळत नाहीत. मात्र अशा ठिकाणी निस्वार्थ मनाने काम करणाऱ्या अनेक संस्था आणि शिक्षक अशा मुलांना मोफत शिकवून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी झटत असतात.
ओडिशामध्येही एक आजोबा गेली अनेक वर्षे मुलांना मोफत शिकवत आहेत. एका झाडाखाली ते मुलांना घेऊन बसतात आणि त्यांना शिकवतात. गेली ७५ वर्षांपेक्षा अधिक काळ हा त्यांचा दिनक्रम आहे. याबदल्यात ते कुठलीही अपेक्षा करत नाहीत. सर्व काही ते मोकळया मनाने करत आहेत.






