फूड चेनच्या पहिल्या भागात आपण डॉमिनोज पिझ्झाच्या जन्माची गोष्ट वाचली होती. आज दुसऱ्या भागात वाचूया 'पिझ्झा हट'.
कनसास या अमेरिकेतील शहरात राहणाऱ्या दोन भावांनी मिळून पिझ्झा हटची स्थापना 1958 मध्ये केली. डॅन कारनी आणि फ्रॅंक कारनी नावाचे हे दोन भाऊ. कॉलेज मध्ये शिकत असताना काही कमाई पण व्हावी या उद्देशाने यांनी आईकडून सहाशे डॉलर उसने घेतले आणि एका झोपडीसारख्या जागेत पिझ्झा रेस्टॉरंट सुरू केले. नाव नोंदवताना त्यांना नऊच अक्षरे वापरण्याची परवानगी मिळाली म्हणून त्यांनी स्वतःच्या दुकानाचे नाव पिझ्झा हट असे ठेवले.






