टीव्हीवर देशाच्या अध्यक्षाचा रोल साकारणारा कॉमेडीयन खरोखर झाला अध्यक्ष ? कुठे घडलंय हे ??

लिस्टिकल
टीव्हीवर देशाच्या अध्यक्षाचा रोल साकारणारा कॉमेडीयन खरोखर झाला अध्यक्ष ? कुठे घडलंय हे ??

तुम्ही एखाद्या नाटकात राजाचं पात्र सकारात आहात आणि अचानक खऱ्या आयुष्यात लोकांनी तुम्हाला राजा केलं तर ? ही दंतकथा वाटू शकते पण हे खऱ्या आयुष्यात पण घडलं आहे.

Volodymyr Zelensky हे कॉमेडीयन आहेत. त्यांचा Servant of the People नावाचा एक गाजलेला टीव्ही शो येतो. त्यात त्यांचं पात्र अपघाताने देशाचा अध्यक्ष बनतं. या टीव्ही शो प्रमाणेच त्यांच्या खऱ्या आयुष्यात घडलं आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते बहुमताने युक्रेनचे अध्यक्ष बनणार आहेत. त्यांना तब्बल ७३% मतं मिळाली आहेत.

त्यांना लगेचच युक्रेन चे अध्यक्ष म्हणता येणार नाही कारण ३० एप्रिल रोजी अधिकृतरीत्या निकाल जाहीर झाल्यावर हे ठरेल. या मधल्या काळात इस्टरची सुट्टी असल्याकारणाने निकालाची थोडी वाट बघावी लागणार आहे.

Volodymyr यांचा हा विजय युक्रेनमध्ये अनागोंदी माजू पाहणाऱ्या रशियन कट्टरपंथीयांच्या विरोधातला विजय मानला जातोय. त्यांचे विरोधक Petro Poroshenko यांनी त्यांच्या विनोदी अभिनेता असल्याबद्दल खिल्ली उडवली होती आणि युक्रेनच्या नागरिकांना त्यांना मत दिल्यास देशाला भारी किंमत मोजावी लागेल असं सांगितलं होतं, पण जनतेने दिलेला कौल काहीतरी वेगळंच सांगतोय.

तर मंडळी, हा योगायोग म्हणायचा की चमत्कार ?

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख