फेसबुक ट्विटर बंद होणार म्हणून ऑर्कुट ट्रेंड होत आहे? #orkut मागचं कारण जाणून घ्या!!

लिस्टिकल
फेसबुक ट्विटर बंद होणार म्हणून ऑर्कुट ट्रेंड होत आहे? #orkut मागचं कारण जाणून घ्या!!

आपल्याकडे व्हॉट्सॲप बंद होण्याची बातमी आली तेव्हा सिग्नलची, टेलिग्रामची चर्चा झाली. ट्विटरला पर्याय म्हणून कू ॲपकडे अनेकजण वळले. गुगल फोटो मोफत सेवा बंद करणार असे कळले तर सगळेजण iDrive आणि फ्लिकरकडे वळले. नुकतीच फेसबुक, ट्विटर बंद होणार अशी चर्चा झाली आणि नेटकऱ्यांना ऑर्कुटची आठवण झाली. #orkut हा ट्रेंड जोरदार फिरतोय. यावर नेहमीप्रमाणे गंमतीदार मिम्स तयार झाले आणि ते लोकप्रिय होऊ लागले. काहींना वाटले खरंच ऑर्कुट परत येतेय का? पण ही सगळी गंमत आहे.  

ऑर्कुट तुम्हाला आठवत असेल तर ही पहिली सोशल  मिडीया नेटवर्किंग साईट होती. नव्या जुन्या मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी ऑर्कुट बुयुक्कोकटेन नावाच्या गूगल कर्माचा-याने ती तयार केली होती. ऑर्कुटचा वापर जगभरात दहा कोटीहून अधिक लोक करत होते.पण काही काळाने फेसबुक नावाची नवीन सोशल मिडीया साईट आली आणि लोकांचा लोंढा तिकडे वळला. या स्पर्धेत ऑर्कुट टिकू शकलं नाही. अखेर २०१४ साली गुगलने ऑर्कुट बंद करण्याची घोषणा केली आणि नेटवर्किंग बंद पडले. 

ऑर्कुटचा नॉस्टॅल्जिया झाल्याने कितीतरी विनोदी मिम्स व्हायरल झाल्या आहेत, ते एकदा पाहून घ्याच. 

फेसबुक-ट्विटर बंद होणार का?

फेसबुक किंवा ट्विटर बंद होणे ही भीती निराधार आहे. नवीन नियमांनुसार सोशल मिडीयावर बंदी घातली जाऊ शकत नाही. कलम ७९ च्या तरतुदीनुसार डिजिटल नेटवर्क प्लॅटफॉर्म बंद होऊ शकत नाही. पण त्यावरील काही माहिती किंवा पोस्ट नियमांत बसत नसतील, तर त्याविरोधात  कायदेशीर कारवाई होऊ शकते.  थोडक्यात काय नियम पाळा आणि कारवाई टाळा. 

तर, सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स निर्बंध असावेत का?  तुम्हाला काय वाटते?

लेखिका: शीतल दरंदळे

टॅग्स:

bobhata marathiBobhatamarathi

संबंधित लेख