आजवर अनेक धाडसी गुप्तहेरांच्या कथा तुम्ही वाचल्या आहेत. पण आज आम्ही जगातल्या सर्वात सुंदर गुप्तहेराची गोष्ट सांगणार आहोत. हिच्या सौंदर्यामुळं पहिल्या महायुद्धाचं पारडं फिरलं होतं असं म्हटलं जातं. तिच्या काळातील कदाचित सर्वाधिक चर्चित गुप्तहेर म्हणून तिची ओळख असेल एवढं तिचे व्यक्तिमत्व आकर्षक होतं.
तिचं नाव माता हारी. पाउलो कोहलो नावाच्या जगप्रसिद्ध लेखकाने या बाईबद्दल 'द स्पाय' नावाचे पुस्तक लिहिले आहे. माता हारी म्हणून जरी तिची ओळख असली तरी तिचे खरे नाव ते नव्हते. तिचं खरं नाव गेरतृद मार्गरेट जेले. तिचा जन्म सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा. १८७६चा. ती नेदरलँडमध्ये जन्मली, पण ती लहानाची मोठी पॅरिसमध्ये झाली. ती एक उत्तम नर्तिका होती आणि गुप्तहेरही होती. आपल्या या प्रतिभेचा वापर तिने खूप चांगल्या पद्धतीने करून घेतला. पहिल्या महायुद्धात ती जर्मनीसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती आणि त्यातच सापड्लयाने तिचा अंत झाला.












