उडणारा मासा असतो हे तुम्हाला माहित आहे का? हा मासा तसा भारतात दुर्मिळच पण अधूनमधून तो सापडल्याची चर्चा होत असते. नुकतंच पालघर जिल्ह्याच्या मच्छीमारांच्या जाळ्यात असाच एक उडणारा मासा सापडला. ह्या माशाला खरोखर उडता येतं का? या माशाचं वैशिष्ट्य काय? तो नेमका कुठे आढळतो? चला तर आजच्या लेखातून या नव्या माशाची ओळख करून घेऊ या.
जर्नादन दळवी या स्थानिक मच्छिमाराला पालघर जिल्ह्याच्या वाढवण समुद्र किनारी पंख असलेला मासा सापडला आहे. ह्या माशाला स्थानिक लोक पाखरु मासा म्हणून ओळखतात. हा मासा अतिदुर्मिळ आहे. त्यामुळे परिसरात या माशाचीच चर्चा रंगली असुन त्याला पाहण्यासाठी वाढवण समुद्र किनारी लोक गर्दी करत आहेत.







