महाराष्ट्रातल्या ९ जिल्ह्यांमधल्या ३४ मंदिरांमध्ये वसई येथील चर्चच्या घंटा आढळतात. ही मंदिरं कोणती हे समजल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. उस्मानाबादचं तुळजा भवानी मंदिर, साताऱ्याचं शिखर शिंगणापूर मंदिर, जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर ही त्यातली प्रमुख नावे. जेजुरी मधल्या घंटेचा आवाज तर इतका मोठा होता की स्थानिकांनी तक्रार करून घंटा काढण्यास लावली. आता ती जेजुरी संस्थानाच्या गोदामात आहे.
मंडळी, या घंटा वसईच्या चर्च मधून महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये कशा विराजमान झाल्या ? प्रश्न पडला ना ? आज महाराष्ट्राचा एक वेगळा इतिहास जाणून घेऊया.









