रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात आणि लाखो लोक तिकीट रद्दही करतात. तिकीट रद्द करताना रेल्वे आपल्याकडून फी घेतं. या लहानशा फीचा लाखो लोकांशी गुणाकार केला तर रक्कम किती होईल? कोटा येथील सुजित स्वामी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराखाली हा प्रश्न रेल्वेला विचारला होता. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर बघून धक्का बसेल.
रेल्वे विभागाने रद्द झालेल्या तिकीटातून आणि वेटिंग तिकिटातून कमावले आहेत तब्बल इतके कोटी रुपये !!


रेल्वे विभागाने म्हटलंय की रद्द केलेल्या तिकीटाची फी आणि रद्द न केलेल्या वेटिंग तिकीटाच्या रकमेतून रेल्वे विभागाने मागच्या ३ वर्षात ९००० कोटी रुपये कमावले आहेत. ही कमाई २०१७ ते २०२० सालातली आहे.

१ जानेवारी, २०१७ ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान जवळजवळ ९.५ कोटी लोकांनी आपलं वेटिंग मधलं तिकीट रद्द केलं नाही. या तिकिटांची रक्कम तब्बल ४,३३३ कोटी रुपये आहे. याचप्रमाणे तिकीट रद्द करण्यासाठी आकारण्यात आलेल्या एकूण फी मधून रेल्वे विभागाला ४,६८४ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या उत्तरात म्हटलंय की ही कमाई सर्वात जास्त स्लीपर कोच आणि Third AC मधून झालेली आहे.

सुजित स्वामी यांनी या उत्तराचा आधार घेऊन म्हटलंय की ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकीट खरेदीत खूप मोठा फरक आहे. दोन्ही पद्धतीत असलेल्या फरकामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. यासाठी नियमांमध्ये आवश्यक ते बदल करावेत अशी विनवणी त्यांनी राजस्थान हायकोर्टाला केली आहे.
बोभाटा वाचकांनो तुमचा रेल्वे आरक्षणाचा अनुभव कसा आहे? आम्हाला नक्की सांगा.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१