गेले दोन दिवस पडणार्या पावसाने अनेक गावात -शहरात पूर आला आहे. शहरात अनेक नव्या वसाहतीत पाणी साचल्याने बर्याचजणांना एका अनपेक्षीत संकटाला सामोरे जावे लागते आहे. हे संकट म्हणजे अगदी 'सेफ पार्कींग लॉट' किंवा 'ओपन गॅरेज' मध्ये उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत .या सर्व गाडी मालकांच्या समोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे तो म्हणजे या नुकसानीची भरपाई इन्शुरन्स कंपनी देणार का ?
आज या समस्येचे निराकरण 'बोभाटा'च्या माध्यामातून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत.








