आयुष्यात बऱ्याचदा आपल्यासोबत पण कतीतरी विचित्र गोष्टी घडत असतात, पण त्यामागची नेमकी कारणे आपल्याला कळत नाहीत. स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी दिसणं, आपल्याला कुठे तरी दुसरीकडे जायचं असत पण चुकून एखाद्या वेगळ्याच ठिकाणीच पोहोचतो, पण तिथे गेल्यावर काही तरी इतक्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घडतात, की वाटतं हे आपल्या सोबतच होणार होतं का? कधीकधी अनपेक्षितपणे काही तरी चांगले फायदेही होतात तर कधीकधी तोटे.
अशीच एक गोष्ट घडली आहे, रॉबर्ट टॉल्पी या अमेरिकन टिकटॉक स्टार सोबत. रॉबर्ट हा अमेरिकेतील १९ वर्षांचा एक तरूण आहे. तो टिकटॉकसह इतर सोशल मिडियावरदेखील सक्रीय असतो. सोशल मिडिया इन्फ़्लुएन्सर म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या टिकटॉक व्हिडीओचा कंटेंट एकदम जबरदस्त आणि विनोदी असतो. इतर टिकटॉक स्टार आहेत त्यांना उद्देशूनही कधीकधी तो व्हिडीओ बनवतो. असा हा रॉबर्ट आत्ता चर्चेत आहे तो एका वेगळ्याच कारणाने ते कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल.






