आपल्या निरोगी जीवशैलीसाठी आपल्या स्मार्ट फोनवर अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. हे अॅप आपले रोजचे चालणे, पळणे, सायकलिंग, अन्नामधून पोटात जाणाऱ्या कॅलरी अश्या अनेक गोष्टी मोजत असतात आणि त्याप्रमाणे निरोगी राहण्यासाठी टिप्सही देत असतात. आपण त्यामुळे स्वतःचा हेल्थ ग्राफ अगदी सहज पाहू शकतो. पण कधी असे अॅप पाहिले आहे का ज्यामध्ये माणसांमुळे पर्यावरणाला होणारा धोका मोजला जाऊ शकतो. म्हणजे आपण उत्सर्जित केलेला कार्बन मोजणारा कोणी आहे का? तर आहे .
कार्बन फूटप्रिंट किंवा मराठीत कार्बन उत्सर्जन म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून किंवा तो वापरत असलेल्या उपकरणांतून सोडला जाणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू. कार्बन फूटप्रिंट मोजणारे भारताचे पहिले अॅप नुकतेच आले आहे. त्याचे नाव आहे कार्बन वॉच. हे अॅप UT Environment Department संस्थेने तयार केले आहे. हे अॅप डाउनलोड केल्यास सरासरी कार्बन फूटप्रिंटचे विश्लेषण मिळते.






