स्टेट बँक ऑफ इंडियाला त्यांची चूक चांगलीच महागात पडली आहे. एका ग्राहकाच्या खात्यातून चुकून १०,००० रुपये वजा केल्यामुळे त्यांना भरपाई म्हणून तब्बल १ लाखाचा भुर्दंड भरावा लागला आहे. हा किस्सा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे, कारण अनेकदा ATM मधून पैसे काढताना अशा गोष्टी घडतात, पण जर कायद्याची योग्य जाण असेल तर आपलं नुकसान होण्यापासून वाचू शकतं.
SBIला खातेदाराचा ATM व्यवहार फेल होऊनही पैसे कापल्याबद्दल झाला १ लाखाचा दंड!!


चला तर हा किस्सा वाचूया.
जानेवारी २०१७ मध्ये उदारु सावोत्तमा रेड्डी नावाचा माणूस ‘एसबीआय’च्या एटीएममधून १०,००० रुपये काढायला गेला होता, पण तांत्रिक बिघाडामुळे रेड्डीला पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर २० दिवसांनी अचानक त्याच्या खात्यातून १० हजार रुपये वजा करण्यात आले.
रेड्डीने बँकेत तक्रार केली. बँकेने सांगितलं की एटीएममधून पैसे काढले गेले होते याची खात्री पटत नाही तोवर ते पैसे होल्डवर ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर रेड्डीला सांगण्यात आलं की एटीएममधून पैसे काढण्यात आले होते आणि म्हणून त्याच्या खात्यातून पैसे वजा करण्यात आले आहेत.

हे प्रकरण पुढे हायद्राबाद येथील रिझर्व बँकेच्या बँकिंग लोकपालपर्यंत पोहोचलं, पण बँकिंग लोकपालने कोणतीही चौकशी न करता खटला बंद केला. रेड्डीने यानंतर ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १२ अंतर्गत खटला भरला.
बँकेने आपल्या बचावात म्हटलं की व्यवहार यशस्वी झाला होता, पण त्यावेळी तांत्रिक बिघाड झालेला असल्याने पैसे वजा व्हायला २० दिवस लागले. याखेरीज बँकेने असंही म्हटलं की रेड्डीने पैसे काढले त्यानंतर एटीएममध्ये रक्कम शिल्लक राहिली नव्हती त्यामुळे त्यांना वाटतं की व्यावहार झाला होता.

एसबीआयने याही पुढे जाऊन म्हटलं की कन्झ्युमर कोर्टात हा खटला लढला जाऊ शकत नाही कारण हा ग्राहक आणि उत्पादक असा वाद नाही. यावर कन्झ्युमर कोर्टाने म्हटलं की ग्राहकाने बँकेचं एटीएम वापरलं याचा अर्थ तोही ग्राहक आहे. शिवाय सेव्हिंग अकाऊंटमध्ये रेड्डीची नोंद ग्राहक अशीच आहे.
या संपूर्ण खटल्यात बँकेकडून सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यात आले नाही. बँकेकडून सीसीटीव्ही फुटेज ९० दिवसच ठेवले जातात आणि खटल्याच्या दरम्यान ९० दिवसांचा वेळ निघून गेल्याने फुटेज मिळणार नाही असं सांगण्यात आलं. खरं तर खटला ९० दिवसांच्या आतच भरण्यात आला होता. याचा अर्थ बँकेने पळवाट शोधली होती. हे कोर्टाच्या नजरेतून सुटलं नाही.

कोर्टाने निर्णय देताना म्हटलं की या गलथानपणासाठी संपूर्णपणे बँक जबाबदार आहे. कोर्टाने एसबीआयला रेड्डीचे १०,००० रुपये आणि ९०,००० रुपयांची भरपाई असे एकूण १ लाख रुपये देण्याचे आदेश दिलेत.
आणखी वाचा :
ATM वर डल्ला : ATM 'स्कीमिंग' म्हणजे काय ? ते कसे ओळखाल ? त्यापासून सावध राहण्यासाठी काय कराल ?
हॅकरचा हल्ला : भाग २ - तुमच्या खात्यावर हॅकरने डल्ला मारू नये म्हणून काय कराल ??
हॅकरचा हल्ला : भाग ३ - तुमच्या खात्यावर हॅकरने डल्ला मारलाच तर काय कराल !!
जाणून घ्या नक्की कसं चालतं ATM !!
एटीएम, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड वापरता? मग या चार गोष्टी तुम्ही कधीच करू नका...
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१