'एग केजरीवाल' आणि अरविंद केजरीवाल यांचा काय संबंध आहे?

लिस्टिकल
'एग केजरीवाल' आणि अरविंद केजरीवाल यांचा काय संबंध आहे?

एग केजरीवाल या डिशबद्दल तुम्ही ऐकलंय/वाचलंय का? हे नाव पहिल्यांदाच वाचत असाल तर तुम्हाला अरविंद केजरीवाल नक्कीच आठवतील. त्यांच्याशी या डिशचा काय संबंध आहे? या डिशला मिळालेलं नाव अरविंद केजरीवाल यांच्या नावावरून मिळालं आहे का ? मुळात एखाद्या डिशला एग केजरीवाल नाव का मिळालं असेल?

चला आजच्या लेखातून जाणून घेऊया.

मंडळी, ही गोष्ट एका वेगळ्या केजरीवाल नावाच्या व्यक्तीची आहे. हे केजरीवाल म्हणजे 'देवी प्रसाद केजरीवाल'

देवी प्रसाद यांना अंडी आवडायची, पण घरात मांसाहारावर सक्त बंदी होती. आपली भूक भागवण्यासाठी ते रोज मुंबईच्या विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्ये जायचे. क्लबमध्ये त्यांच्यासाठी अंड्याची खास डिश बनवली जायची. हीच  डिश. आज 'एग केजरीवाल' नावाने प्रसिद्ध आहे. साहजिकच देवी प्रसाद यांच्यासाठी असल्यामुळे डिशला केजरीवाल नाव मिळालं.

काय वेगळं होतं या डिशमध्ये?

काय वेगळं होतं या डिशमध्ये?

तशी ही साधीच डिश होती. ब्रेड किंवा टोस्टवर फक्त खालून बॉईल केलेलं अंड पसरलेलं असायचं. मध्ये चीज आणि वरून बारीक चिरलेल्या मिरच्या असायच्या. ही डिश पुढे इतर लोकांनीही चाखली. ती पुढे एवढी प्रसिद्ध झाली की क्लबने तिला आपल्या मेन्यूमध्ये जागा दिली. आज अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंट्स एग केजरीवाल सर्व्ह करतात. एवढ्या वर्षानंतरही बनवण्याची पद्धती अगदी तशीच आहे.

तर मंडळी, तुम्ही कधी रेस्टॉरंटमध्ये गेलात तर एग केजरीवाल नाव बघून आश्चर्यचकित होऊ नका. आणि हो, अरविंद केजरीवाल यांच्याशी या डिशचा काहीही संबंध नाही.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख