जेल ब्रेक किंवा तुरुंगातून पलायन म्हटलं की आपल्याला आठवतो शोले मधला 'जय -विरू'चा जेल ब्रेक, काहींना चार्ल्स सोभराज नावाच्या गुन्हेगाराने तुरुंगातून काढलेला पळ पण आठवेल. नव्या जनरेशनला जेलब्रेक म्हटल्यावर अॅपलचे ऑपरेटींग सिस्टीम तोडणारे सॉफ्टवेअर आठवेल, इंग्रजी सिनेमे बघणार्यांना जेलब्रेकवर आधारीत अनेक चित्रपट आठवतील. एकूण जेलब्रेक हा प्रकार वाचायला ऐकायला चित्तथरारकच असतो नाही का ?
तर मंडळी आज आपण वाचणार आहोत तिहारसारख्या तुरुंगातून पलायन केलेल्या एका स्मगलरच्या जेलब्रेकची कथा !! या कथेत हा स्मगलर फक्त तुरुंगातून पळाला इतकंच नाही तर त्यानंतर अगदी दिवसाढवळ्या दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावरून विमान घेऊन चक्क पाकीस्तानला फरार झाला !! काहींच्या मते तर पाकीस्तानला पळून जाण्यापूर्वी त्याने तिहार जेलवर घिरट्या घालून त्याच्या कैदी मित्रांवर चॉकलेट बिस्कीटांचा वर्षाव केला होता ! या प्रकरणातले सत्य असत्य काय ते या लेखात आपण बघूच पण भारत सरकारला वाकुल्या दाखवत तो पळाला हे नक्की !!











