साडी रोज नेसा किंवा सहा महिन्यांतून एकदा, व्यवस्थित साडी नेसणं ही एक कला आहे. त्यातही जॉर्जेट आणि शिफॉनसारख्या साड्या असतील तर ठीक आहे, पण बनारसी आणि कांजीवरमसारख्या भारीतल्या रेशमी साड्या नेसायच्या म्हटलं की भल्याभल्या बायकांची वाट लागते. नुसती साडी नेसून चालत नाही. ती सर्व बाजूंनी समतल असावी लागते, साडीतून चपला दिसू नयेत ती इतकी खालपर्यंत यावी लागते पण त्याचसोबत चालताना पाय अडखळू नये इतपत ती वरती असायला लागते. हे प्रकरण इथंच संपत नाही हं.. पदर खांद्यावरून घ्यायचा की पिनअप करायचा, की आणखी वेगळ्या पद्धतीने ड्रेप करायचा यावरूनही त्या व्यक्तीचा लुक चांगला किंवा वाईट ठरू शकतो.. या सगळ्या भानगडींमुळे अगदी कसलेल्या बायकासुद्धा समारंभाच्या वेळेस साडी नेसवायला पार्लरवालीला बोलावतात. पण मग सेलेब्रिटी अशावेळेस काय करतात?
ते डॉली जैनला बोलावतात!!









