पब्जी पासून नुकसान होते हे तुम्ही ऐकले असेल. पब्जीमुळे मुलं कशी बेजबाबदार होत आहेत, त्यांचे कसे करियरवर दुर्लक्ष होत आहे या गोष्टी नेहमी ऐकण्यात येतात. पण आज काहीतरी वेगळं घडलंय. एका पब्जी प्लेयरने चक्क भारतीय सैन्याला मदत केली आहे!!
जिंकलेली सगळी रक्कम सैन्याला दान करणार....'पब्जी'च्या या टीमचं कौतुक तर झालंच पाहिजे !!


पब्जी मोबाईल क्लब ओपन फॉल स्प्लिट 2019 या नावाची दक्षिण आशियाई देशांसाठी एक स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यात भारतीय प्रोफेशनल पब्जी प्लेयर्सची ‘सोल’ (SouL) या नावाच्या टीमने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर या टीमची जागतिक स्तरावरील फायनलसाठी निवड झाली आहे. आता या टीमची स्पर्धा जगभरातील टिम्स सोबत होणार आहे.
खरी बातमी संपलेली नाही!! या टीमचा प्रमुख असलेला नमन माथूर जो मोर्टल या नावाने ओळखला जातो. त्याने फेसबुक पोस्ट करून सांगितले की या स्पर्धेत जिंकेलेली सगळी रक्कम ते भारतीय सैन्याला देणार आहेत.

त्या पोस्टमध्ये त्याने स्टेडियमवर त्याला समर्थन देणाऱ्या फॅन्सचे आभार मानले आहेत. आणि जिंकलेली रकम सैन्याला देण्याचे जाहीर केले आहे.
मंडळी, टीम ‘सोल’ ही एकमेव भारतीय टीम आहे जी वर्ल्ड फायनलसाठी पात्र ठरली आहे. वर्ल्ड फायनल क्वालालांपुर येथे नोव्हेंबरच्या शेवटी भरवण्यात येणार आहे.
लेखक : वैभव पाटील
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१