एकाच वेळी आश्चर्य आणि भीती निर्माण करणारी ही कादंबरी म्हणजे अमीरअली नावाच्या ठगाचे आत्मकथन आहे. 'बोभाटा'ने ही कादंबरी क्रमशः स्वरुपात प्रकाशित करण्याचा मनसुबा 'वरदा प्रकाशन ' यांच्याकडे मांडल्यावर काही शर्ती आणि अटींसोबत ही कादंबरी बोभाटाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची परवानगी वरदा प्रकाशन यांनी दिली. आम्ही त्यांचे आभारी आहोत. या कामात श्री रविप्रकाश कुळकर्णी आणि श्री हेमंत रायकर यांचे बहुमोलाचे सहकार्य आम्हाला मिळाले. बोभाटा त्यांचे आभारी आहे.
आता काही खास सूचना आमच्या वाचकांसाठी : या कादंबरीचे प्रत्येक प्रकरण बोभाटाच्या संकेतस्थळावर फक्त चार दिवस वाचायला मिळेल. त्यानंतर ते अप्रकाशित करण्यात येईल. मूळ पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री. विश्वनाथ घैसास यांनी रेखाटले होते. या व्यतिरिक्त 'बोभाटा'वरची इतर रेखाटने 'बोभाटा'चे मित्र श्री कुमार मोरे यांनी तयार केली आहेत. या पुस्तकाचे सर्व हक्क मूळ प्रकाशकांकडे सुरक्षित आहेत.
तर वाचकांनो लवकरच वाचू या 'ठगाची जबानी'!!