रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा विरोधक अलेक्सी नवेलनीला सप्टेंबर, २०२० साली ‘नोव्हीचो’ या अत्यंत विषारी रसायनाने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अलेक्सी नवेलनी हा पुतीन आणि रशियन व्यवस्थेतील भ्रष्टाचार विरोधी चेहरा मानला जातो. म्हणून या घटनेची दाखल संपूर्ण जगभर घेतली गेली होती. असं म्हणतात की या मागे खुद्द पुतीन यांचा हात होता. खरं काय ते कोणालाही सांगता यायचं नाही.

(अलेक्सी नवेलनी) स्रोत
अलेक्सी नवेलनीने उभारलेला सरकार विरोधी लढा आता वाढताना दिसतोय. जर्मनीत उपचार घेतल्यानंतर अलेक्सी नवेलनीला रशियात अटक करण्यात आली आणि त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. त्याची सुटका व्हावी म्हणून त्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरलेत. तसं पाहायला गेलं तर अशी आंदोलनं जगभर होतच असतात, मग आम्ही या आंदोलनाचीच बातमी का देत आहोत. तर या आंदोलनामध्ये दिसणारी एक विचित्र बाब म्हणजे आंदोलकांच्या हातात चड्डी, टॉयलेट साफ करण्याचा ब्रश दिसतोय. हा काय प्रकार आहे नक्की?




