झोप प्रत्येक प्राणिमात्रासाठी आवश्यक असते, पण सगळेच प्राणी ७ ते ८ तास झोपत नाहीत राव. विज्ञान म्हणतं की मासे केवळ १० ते १५ मिनिट झोप घेतात तर त्या उलट कोअला नामक प्राणी तब्बल २० ते २२ तास झोपून राहतो. माणसाच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. लहान बाळ १६ ते १८ तास झोपू शकतं तर साधारण माणूस ९ तास झोपू शकतो (यात आळशी लोकांना गृहीत धरलेलं नाही.)
मंडळी, आज झोपेचा विषय काढण्याचं कारण म्हणजे आम्हाला १० असे प्राणी गवसले आहेत ज्यांना बघून कोणालाही वाटेल - 'यांचा जन्मच फक्त झोपण्यासाठी झाला आहे'. चला तर बघुयात ते प्राणी आहेत तरी कोण !!














