आपण सर्वांनी आपल्या आजी आजोबांना असं म्हणताना नक्कीच ऐकलं असणार की, "आमच्या काळातली प्रेम प्रकरणंच वेगळी होती. एका व्यक्तीवर प्रेम केलं की आयुष्यभर त्याच व्यक्तीवर प्रेम असायचे. नाहीतर आजकालची ही मुलं, आज एकीसोबत तर उद्या दुसरीसोबत. त्यात भर त्या टिंडरची."
पण जुनी माणसं काहीही म्हणू देत किंवा काळ कोणताही असो, प्रेम कधीच बदललेलं नाहीये. निखळ प्रेमाची कहाणी सांगणारा हॉलिवूडमध्ये एक सिनेमा बनलेला. २००४ रोजी तो प्रदर्शित झालेला. त्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. खूप लोकांना रडवलं ह्या सिनेमाने. तो सिनेमा होता 50 First Dates. बऱ्याच लोकांना माहीत असेल हा सिनेमा. पण ह्या सिनेमाची कथा ही एका सत्य घटनेवर आधारित होती हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात कोण होते ते दोघे. त्या आधी सिनेमा बद्दल थोडं.








