लातूर येथील निलंग्यात देशातील पहिली गवताची प्रतिमा साकार झाली आहे. तीही आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची. पण त्याहून महत्वाची बातमी काय आहे माहितीये मंडळी? तर ही प्रतिमा चक्क गुगल मॅपवर आली आहे. तुम्ही गुगल मॅपवर सर्च केल्यास तुम्हाला महाराजांची गवताने तयार केलेली प्रतिमा दिसेल. हा खऱ्या अर्थाने कलाकाराचा आणि त्याच्या कलेचा गौरव आहे मित्रांनो. कारण एखादी गोष्ट गुगल मॅपवर दिसणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी त्या ठिकाणाचे काहीतरी महत्व असावे लागते. त्यामुळे सगळीकडे या प्रतिमेची चर्चा आहे. मंडळी या प्रतिमेसाठी निलंग्यात स्पेशल शेत तयार करण्यात आले होते. त्या शेतात ही प्रतिमा तयार करण्यात आली. महाराजांच्या या भव्य कलाकृतीचे निर्माण अक्का फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
तब्बल 2.5 लाख स्केवर फूट शेतात तयार करण्यात आलेली ही प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे राव!! गवत उगवून तयार केलेली ही प्रतिमा मंगेश निपाणीकर यांनी तयार केली आहे.







