फार कमी कलाकार असतात ज्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत 'खरी' पोकळी निर्माण होते. गेले वर्ष अनेक गुणी अभिनेत्यांना घेऊन गेलं. त्यापैकी इरफान खान हे नाव. त्यांनी फक्त भारतीय चित्रपटसृष्टीच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या दमदार आणि सहजसुंदर अभिनयाने छाप सोडली. कोणाच्याही शिफारसी किंवा ओळख न सांगता यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कोणीही गॉडफादर नसलेला हा "सेल्फ मेड" असा अभिनेता म्हणता येईल.
चला तर आज पाहुयात इरफान खान यांच्याबद्दल काही अश्या गोष्टी ज्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे.












