प्रामुख्याने सर्व प्राणी हे अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. पण काही अश्याही वनस्पती आहेत ज्या प्राण्यांवर अवलंबून असतात. आता तुम्ही म्हणाल वनस्पती स्वत:चे अन्न क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्याच्या साहाय्याने तयार करतात. अगदी बरोबर, परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि हे अन्न त्यांना कीटक वा अन्य प्राण्यांकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. जसे आपण nutrition suppliment घेतो तसेच.
या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असे म्हणतात. मांसाहारी म्हणजे लहान किडे, कीटक हे यांचे भक्ष्य असतात. बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत दिसतात. यांच्या जवळपास ७०० जाती आहेत.
आजच्या लेखातून यातल्या प्रमुख मांसाहारी वनस्पती पाहूया.











