२०२० नंतर अनेक छोटेमोठे बिजनेस डबघाईला आले. अनेकांच्या समोर आर्थिक संकट उभे राहिले. पण या संकटातही घट्ट पाय रोवून उभी राहिली ही मेरठची मुलगी. आज ती गांडूळखतातून करोडो रुपयांची कमाई करत आहे. इंजिनिअरिंग पूर्ण करून एखाद्या मोठ्या कंपनीच्या पॅकेजच्या मागे न लागता ही तरुणी शेतात राहिली आणि गांडूळखत प्रकल्प तिने यशस्वी करून दाखवला. आज वाचूयात तिची प्रेरणादायी कहाणी..
उत्तर प्रदेश राज्यात मेरठ शहरातील सना खान असे त्या मुलीचे नाव आहे. ती एसजे ऑर्गेनिक्सची (SJ Organics) मालकीण आहे. तिने आपल्या शेतात गांडूळखत प्रकल्प राबवला. रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरता गांडूळखत वापरल्याने पिकांना खूप फायदा झाला. हा प्रकल्प केला तर खूप शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पिके वाढवायला त्याची मदतच होईल. तिला हे खूप लवकर लक्षात आले.








