नवरी चक्क कारच्या बोनेट वर बसून निघाली.. या भन्नाट कल्पनेला पोलिसांनी ब्रेक कसा लावला?

लिस्टिकल
नवरी चक्क कारच्या बोनेट वर बसून निघाली.. या भन्नाट कल्पनेला पोलिसांनी ब्रेक कसा लावला?

आपलं लग्न सर्वांच्या लक्षात राहायला हवे असे सर्वच लोकांना वाटत असते. त्याचसाठी मग लग्नात नाना तऱ्हाच्या गोष्टी पाहायला मिळतात. काही लोक लग्नाच्या निमित्ताने समाजोपयोगी कामे करतात तर काही मात्र स्टंटबाजी करण्यात धन्यता मानतात. 

आजवर लग्नात गाडी सजवून तिच्या आत बसून नवरदेव नवरीला घेऊन जाण्याची उदाहरणे तुम्ही अनेक बघितले असणार. मात्र पुण्यात एका वधूला सजवलेल्या गाडीच्या बोनटवर बसून जाण्याची इच्छा झाली. ही इच्छा मात्र चांगलीच अंगलट आलेली दिसत आहे.

महाराष्ट्रभर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल सुद्धा झाला आहे. पुणे - सासवड मार्गावर दिवेघाटजवळ हा व्हिडीओ शूट करण्यात आला. गाडी मागे चालत आहे तर पुढे मोटरसायकलवर बसून फ़ोटोग्राफर व्हिडिओ शूट करण्यासाठी प्रयत्न करतोय असे हे चित्र होते. गाडीत वधूचे कुटुंबीय बसलेले दिसत आहेत. 

ही आयडिया मात्र या सर्वांना महागात पडेल असे चित्र आहे. वधू, गाडीत बसलेले लोक, ड्रायव्हर आणि व्हिडिओग्राफरवर या सर्वांवर मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकानेही मास्क घातला नसल्याने महाराष्ट्र कोविड रेग्युलेशन ऍक्टच्या अंतर्गतही कारवाई होणार आहे.

तर अशा पद्धतीने सुखाच्या क्षणात संकट या लोकांनी ओढवून घेतले असे म्हणता येते. म्हणुनच आयडिया करण्यापूर्वी कायदे कलम यांचा आधी अभ्यास करून मगच स्टंटबाजी करावी हीच शिकवण या उदाहरणावरून मिळते.

टॅग्स:

Bobhata

संबंधित लेख