वाहनांचे अपघात हे कोणत्याही कारणाने घडू शकतात. गाडीतल्या तांत्रिक बिघाडापासून ते दरड कोसळणे, रस्त्यांवरचे खड्डे, इत्यादी करणे देता येतील, पण कधी गाडी चालवणाऱ्याने स्वतःच अपघात ओढवून घेतल्याचं ऐकलंय का? हे दुर्मिळ प्रकरण आहे.
अशीच एक घटना अमेरिकेच्या ओहायो येथे घडली. एका कारचा अपघात झाला. कारमध्ये एक महिला आणि तिची ११ वर्षांची मुलगी होती. पोलिसांनी तपास केल्यावर त्या महिलेने अपघाताबद्दल जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनीही कपाळावर हात मारला असेल.
ती म्हणाली की, ‘मी स्वतःची श्रद्धा तपासून पाहण्यासाठी गाडीवरचा ताबा सोडून दिला आणि गाडी देवाच्या भरवशावर सोडली.’ हे तिने पूर्ण शुद्धीत केले होते. पोलीस तपासात दिसून आले की तिने कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ घेतले नव्हते.




