अडकलेले पैसे, प्रॉपर्टीचा वाद सोडवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया असते. ज्यांना ही प्रक्रिया नको असते ते लोक कायद्याला फाटा देऊ गुद्याचा मार्ग निवडतात. म्हणजे गुंड मंडळींना सांगून आपले प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. या कामाच्या बदल्यात ह्या गुंड मंडळींना कमिशन मिळत असतं.
काही लोकांचा एकप्रकारे हा बिजनेस असतो. पण यूपीत मात्र या प्रकाराने एक वेगळीच उंची गाठली आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही राज्यांचे सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यात यूपी गुन्हेगारीत सर्वाधिक पुढे असल्याचं सांगितलं होतं. सोशल मीडियावर फिरणारे यूपीतील एक पोस्टर याच गोष्टीवर शिक्कामोर्तब करताना दिसत आहे.






