देव तारी त्याला कोण मारी? अशी आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण सार्थ करून दाखवणारा योगायोग नुकताच म्हणजे सोमवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी नेदरलँड्स मध्ये घडला आहे. अगदी एखाद्या हॉलिवूडच्या सिनेमातला वाटावा असा. तिथली डच मेट्रो ट्रेन स्पिजकेनीस येथील डी अकर्स या शेवटच्या स्टेशनपाशी आल्यावर थेट एलिव्हेटेड ट्रॅकच्या शेवटपर्यंत गेली आणि सुमारे ३० फुटांवरून खाली कोसळणार इतक्यात तिथे असलेल्या एका शिल्पाकृतीच्या आधाराने अलगद विसावली.
ती मेट्रो ३० फुटांवरून खाली कोसळणारच होती, पण... कुठे आणि काय घडलं होतं?


पाण्यात सूर मारताना देवमासा जसा दिसेल तशा आकारातलं हे देवमाशाच्या शेपटीचं शिल्प म्हणजेच 'व्हेल्स टेल' २००२ मध्ये रॉटरडॅम शहराच्या बाहेर असलेल्या स्पिजकेनीसमधील डी अकर्स येथे उभारलं गेलं. रेल्वे ट्रॅकच्या टोकाशी असलेल्या या कलाकृतीला नावही अगदी अचूक देण्यात आलं आहे - सेव्ह्ड बाय व्हेल्स टेल! सोमवारी त्याने आपलं नाव सार्थ करून दाखवलं.

हे घडलं त्यावेळी ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते, होता फक्त चालक. तोही या अपघातातून सहीसलामत वाचला आहे. जे काही थोडंफार नुकसान झालं तेवढंच. मात्र ही गाडी शेवटच्या थांब्यापाशी आल्यावरही थांबली कशी नाही हे अजूनही कोडंच आहे. ही ट्रेन रात्रभर आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आली आणि मंगळवारी सकाळी तिला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला गेला.
जवळपास २० वर्षं जुन्या आणि बांधणीत मुख्यतः प्लॅस्टिक वापरलेल्या या शिल्पाने मेट्रो ट्रेनचा आपल्यावरचा भार तोलून कसा धरला याचं मात्र सगळ्यांनाच विशेष वाटतंय.
लेखिका : स्मिता जोगळेकर
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलबसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१