साल होतं २०१३, बीजिंगच्या हवेतील प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. एअर क्वालिटी इंडेक्स (हवामान गुणवत्ता निर्देशांक - AQI ) नुसार बीजिंग मधील प्रदूषणाने ९९३ पर्यंतचा आकडा गाठला होता. ही संख्या म्हणजे धोक्याची घंटा समजली जाते. न्यूयॉर्क मध्ये अगदी याविरुद्ध वातावरण होतं. तिथला AQI चा आकडा फक्त १९ पर्यंत होता.
साल होतं ८ नोव्हेंबर, २०१७. दिल्लीला येणारी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. कारण दिल्लीतलं AQI ने तब्बल ९९९ चा आकडा गाठला होता. आश्चर्य म्हणजे बीजिंग मध्ये अगदी याविरुद्ध वातावरण बघायला मिळतंय. तिथला AQI चा आकडा फक्त ५५ आहे .





