कोणे एके काळी पैशाला रंग नव्हता. कारण चलन म्हणजे नाणी, नोटा अशा स्वरुपात पैसा मोजलाच जात नव्हता. इतकंच काय, तर पैसा हा शब्द पण अस्तित्वात नव्हता. जे होते त्याला फक्त 'धन' म्हटले जायचे. जमीन, सोने, चांदी, यामध्येच श्रीमंती आणि गरीबी मोजली जायची. पण हळूहळू व्यापाराची आणि व्यवहारांची भौगोलिक व्याप्ती वाढत गेली. चलन अस्तित्वात आले. त्यानंतर पेढ्या आल्या. बँकांचा जन्म झाला. करप्रणाली आली. सोबत पैशाला रंग मिळाला. नैतिक मार्गाने मिळवलेला पैसा म्हणजे पांढरा आणि अनैतिक मार्गाने मिळालेला तो काळा पैसा असा भेद तयार झाला. 'एक नंबर का पैसा' आणि 'दो नंबरका पैसा' हे समांतर शब्दप्रयोग आले. त्यातूनच पुढे एक रोग जन्माला आला तो म्हणजे 'हवाला'!!
भारतासारख्या विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेला या हवाल्याने पोखरलेले आहे. आज 'बोभाटा'च्या या खास लेखातून जाणून घेऊ या काय असतो 'हवाला'.

















