लतादीदींचे गाणे आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. त्यांची गाणी थेट मनाला भिडणारी असतात. ही लतादीदींच्या आवाजात जादू आहे आणि म्हणूनच तर एवढे वर्ष झाले तरी आजही त्यांचा करिष्मा टिकून आहे.
मंडळी, काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनवर बसून लतादीदींचे प्रसिद्ध 'एक प्यार का नगमा है' गाणे म्हणणाऱ्या एका बाईचा एक विडिओ आला. तो विडिओ भयाण वायरल झाला राव!! त्या बाईच्या आवाजाचे लाखो लोक फॅन झाले. अस्सल सोनं लगेच लखलखतं, हो ना?






