वाढत जाणारी महागाई (इन्फ्लेशन) हा सध्याचा चर्चेचा आणि काळजीचा विषय आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत जाणार्या किमती आणि हातातील पैशाची घटत जाणारी क्रयशक्ती या दोन्हींचा एकत्र परिणाम म्हणजे महागाई.
विकसीत देश असो वा विकसनशिल देश असो महागाई कमी जास्त प्रमाणात असतेच. जेव्हा हातातल्या चलनाची क्रयशक्ती म्हणजे खरेदी करण्याची ताकद अत्यंत क्षीण अथवा दुर्बळ होते तेव्हा देश आर्थिक संकटात सापडला आहे असे समजले जाते. कारणे अनेक असतात. अस्थिर सरकार, सरकारी धोरणात्मक चूका, सतत युध्दाजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, इतर राष्ट्रांचा व्यापारावर बहिष्कार, नैसर्गिक साधनांचा तुटवडा वगैरे वगैरे !!
















