आपले फोन अपग्रेड होत असतात तसं माणसांचं शरीर अपग्रेड झालं तर ? शरीरात नवनवीन गोष्टींच रोपण करून रोजच्या गोष्टी सोप्प्या करता आल्या तर? अमेरिकेच्या एका इंजिनियरने हे शक्य करून दाखवलं आहे
विंटर मॅझ या अमेरिकन इंजिनियरने एका मोठ्या अपघातानंतर स्वतःच्या शरीरात बदल केलेत. तिच्या शरीरात मायक्रोचिप्स आहे ज्याच्या मदतीने ती घराचा दरवाजा उघडू शकते. याखेरीज तिच्या हातांमध्ये LED लाईट आहेत. एवढंच नाही तर तिच्या बोटांमध्ये लोहचुंबक आहे.







