२००७ साली भारताने टी ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकला. धोनी फॉर्मात आला. त्याच्या काही महिन्यांनी भारताने अंडर १९ वर्ल्डकप जिंकला. एक १९ वर्षांचा मुलगा फॉर्मात आला. नाव होते विराट कोहली. आजच्या घडीला धोनी आणि विराट महान क्रिकेटपटूंच्या यादीत जाऊन पोहोचले आहेत. असाच एक खेळाडू होता, ज्याच्याकडे विराटला मागे टाकण्याची क्षमता आहे असे म्हटले जात होते.
आजपासून ७-८ वर्षांपूर्वी जे क्रिकेट बघत होते, त्यांना उन्मुक्त चंद हे नाव आठवत असेल. पठ्ठ्या वादळाप्रमाणे आला आणि तेवढ्याच जोरात गायब झाला. २०१२ चा अंडर १९ वर्ल्डकप त्याने भारताला जिंकून दिला. उन्मुक्त चंदची बॅटिंगची आपली वेगळी स्टाईल होती. त्याची बॅटिंग आणि मैदानावरील वावर बघून गडी लंबी रेस का घोडा आहे हे सर्वांनी ठरवून टाकले होते.







