व्हिडीओ ऑफ द डे: या बाईला 'ग्रेट वॉल ऑफ चायना' कुठे आहे या प्रश्नासाठी दोन लाईफलाईन वापराव्या लागल्या राव !!

व्हिडीओ ऑफ द डे: या बाईला 'ग्रेट वॉल ऑफ चायना' कुठे आहे या प्रश्नासाठी दोन लाईफलाईन वापराव्या लागल्या राव !!

केबीसी खेळताना स्पर्धक लोक कधीकधी स्वतःचं खूपच हसं करून घेतात राव. आज असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. टर्कीमधल्या कौन बानेगा करोडपती प्रोग्रॅममध्ये एक बाई आली आणि तिला एक छान प्रश्न विचारला, ग्रेट वॉल ऑफ चायना कुठे आहे? ऑप्शनमध्ये भारत, चीन असे पर्याय पण होते. 

आता खंरं तर उत्तर प्रश्नातच दडलेलं आहे.  पण बाई भंजाळली ना राव.  तिला याचं उत्तर येत नव्हतं. मग तिनं जनतेवर विश्वास ठेवायचं ठरवलं आणि ऑडियन्स पोल घेतला. यात फक्त ५१% प्रेक्षकांनी चीन हे उत्तर दिलं, इतर ४९% ची दांडी गुल झाली होती. म्हणून तिनं फोन-अ- फ्रेंड केला आणि कसाबसा प्रश्न पार पडला. पुढच्या प्रश्नात मात्र तिचा निभाव लागला नाही. 

स्रोत

हा भाग टीव्हीवर दाखवल्यानंतर तिची फारच टर उडविण्यात आली.  पण गंमत म्हणजे ऑडिअन्सला पण या प्रश्नाचं उत्तर येतच नव्हतं. यातर ग्रेट वॉल ऑफ चायना कुठे आहे हे गुगलवर सर्च करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. एकूणच टर्कीमधल्या शिक्षण पद्धतीवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत.

 

आणखी वाचा :

'कौन बनेगा करोडपती’ च्या पडद्यामागची १२ गुपितं !!

कौन बनेगा करोडपतीचे विजेते आज काय करत आहेत ?

टॅग्स:

marathi infotainmentbobhata newsmarathi newsmarathi bobhatabobhata marathibobatamarathi

संबंधित लेख