सध्या एक झेवीयर नावाचा गडी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच झेवीयरने केलेल्या केमेंट्सच्या स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत. प्रत्येक मिम खाली त्याची आपल्या स्वतःच्या खास शैलीतली कमेंट असते. काहीवेळा त्याची कमेंट मिम पेक्षा जास्त विनोदी असते. पण प्रत्येक मिमवर कमेंट करणारा हा गडी आहे तरी कोण? चला तर जाणून घेऊ या....
हा झेवीयर आहे तरी कोण? त्याच्या कमेंट्स व्हायरल का होत आहेत ?


खरं तर हा झेवीयर खरा नाही तो कुणीतरी दुसराच आहे. तो आज चर्चेचा विषय असला तरी त्याची चर्चा मागेच्या काही वर्षांपासून होत आहे. असं म्हणतात की या झेवीयर मागील खरा चेहरा पकालू पपिटो नावाचा आहे. आता तो खरच आहे की नाही याबद्दल खात्रीशीर सांगता येत नाही. त्याचा एकच एक फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे. असं म्हणतात की हा भाऊ अमेरिकेतील मिनेसोटा येथे राहतो,
हा पकालू याच नावाच्या पैजेमुळे प्रसिद्ध झाला होता. त्याच्या मित्रांशी त्याने पैज लावली होती की, ५००० ट्विटर फॉलोवर तो कमवून दाखवेल. त्यासाठी त्याने @pakalupapito याच नावाने अकाउंट सुरु केले.

२०१३ साली जुलैमध्ये त्याने काही विनोदी ट्विट्स पोस्ट करायला सुरूवात केली. त्याने फेसबुकवर देखील हेच ट्विट पोस्ट केले. त्याचे नशीब जोरावर होते. २०१५ येता येता त्याने चक्क ट्विटरवर 8 लाख आणि फेसबुकवर 5 लाख फॉलोवर गोळा केले. पण तो जसा वर गेला तसाच तो खाली देखील आला. त्याचे ट्विटर आणि फेसबुक असे दोन्ही अकाउंट कायमचे बॅन झाले.
त्यानंतर अनेकांनी त्याच्या नावाने अकाउंट सुरू केले आहेत. झेवीयर हे देखील त्यापैकीच एक आहे. @Idealistxavier नावाचे हे पेज २९ ऑक्टोबर २०२० रोजी तयार करण्यात आले. त्यावरून हा पकालू पपिटो किंवा झेवियर मिम्स सोबत स्वतःच्या कमेंट्स पोस्ट करत असतो. अवघ्या वीस दिवसात त्याला देखील साडे तीन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले आहेत.


हाच ट्रेंड फॉलो करत इतर मिम्स पेजेसनी झेवीयरचे स्क्रीनशॉट वायरल करायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारे हा सगळा प्रकार सध्या ट्रेंड होतोय. तुम्हाला झेवियरची कमेंट दिसली का?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलबसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१