तुमचा आवडता रंग कुठला? असा कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला पटकन रंग सांगता येईल काय? मंडळी, काही सेकंद विचार करून तुम्ही सांगालच. कारण सगळे रंग सुरेख असतात , प्रत्येक रंगाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. बऱ्याचदा वेगवेगळी रंगसंगती आपल्याला आवडते. आयुष्यात रंगाचे महत्व किती आहे हे आपण सगळे जाणता. पण आज का एवढं रंगाविषयी लिहलंय. नाही….रंगपंचमी नाही आली हो..
आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी आहेत त्यामागे काहीतरी विशिष्ट कारण असते. पण दररोजच्या जीवनात आपण त्याला फार महत्व न देता त्यावर विचार करत नाही. आता हेच बघा, तुम्ही प्रवास करता तेव्हा या एक प्रकारची वाहनं तुम्ही पाहता. जशी अवजड वाहनं मुखत्वे पिवळा रंगात असतात. जसे जेसीबी, खाणकामासाठी वापरले जाणारे मोठ्या आकाराचे ट्रक, डांबरीकरणासाठी वापरले जाणारे रोलर अशी सार्वजनिक बांधकामासाठीची वाहने पिवळ्या रंगाचीच असतात. मुळात आपण सामान्यपणे खोदकाम करणाऱ्या वाहनांना जेसीबी (अर्थमूव्हर्स) असं संबोधतो. खरं जेसीबी हा वाहनांचा प्रकार नसून खोदकाम करणाऱ्या वाहनांची निर्मिती करणारी एक कंपनी आहे. असो, तो विषय वेगळा पण तुम्हाला प्रश्न पडलाय का या वाहनांना पिवळा रंगच का वापरला जातो?









